शंभुराजे मर्दानी खेळ विकासमंच आयोजित शिवकालीन युध्दकला स्वसंरक्षण (मर्दानी खेळ) शिबीर

छत्रपती शिवारायांची य़ुध्दकला व मर्दमराठी शुरवीर मावळ्यांची य़ुध्दकला आजच्या युवा पिढीस अवगत व्हावी.त्याच बरोबर आजच्या काळात मुला-मुलींना स्वत:चे रक्षण करता यावे यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाने शिवकालीन युध्दकला आत्मसात केली पाहिजे.
शीलवान धॆयवान साहसी त्यागी संयमी प्रखर बळकट स्वधर्मभिमानी देशभिमानी उमवती तरूण पिढी हि राष्ट्राची खरी मुलभूत संपत्ती आहे उगवत्या तरूण पिढीला ध्येयवादी बनिवण्यासाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवप्रभुच्या व शंभूराजेच्या अत्यंत प्रेरणादायक जीवनाचा न पुसला जाणारा खोल ठसा त्यांच्या चिंतात उमटवणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी शिवकालीन ढाल तलवार,दांडपट्टा,लाठी,भाला ही शस्त्रे आवश्य शिकली पाहिजेत.

य़ा शिबारामध्ये पुढील गोष्टी शिकवल्या जातील
१) लाठी-काठी. २) दांडपट्टा
३) भाला ४) तलवार
५) धनुर्विद्या ६) रायफ़ल शुटींग
७) ट्रेकिंग ८) गिर्यारोहण
९) हॉर्स रायडिंग १०) पारंपारिक खेळ
शिवकालीन शस्त्रविद्या,साहसी उपक्रम,शिवकालीन किल्ल्यांना भेटी, प्राचीन मंदीर दर्शन

शिबीराचे नियम
१) शिबीर १० दिवसाचे राहिल.
२) शिबीरात प्रवेश घेतल्यानंतर कोण्त्याही कारणास्तव प्रवेश फ़ी परत मिळणार नाही.
३) शिबीरार्थ्यानी शिबीरामध्ये कोणत्याही मॊल्यावान वस्तु सोबत आणु नये.त्याची संयोजकावर राहणार नाही.
४) शिबीरासाठी आवश्यक साहित्य विद्यार्थ्याबरोबर पाठविणे आत्यावश्यक आहे
५) शिबीरासाठी स्वत:साठी लागणारी ऒषधे सोबत आणवीत
६) शिबीरामध्ये शिबीरार्थ्यानी सुचना व नियमांचे पालन करणे आत्यावश्यक आहे
दि. २४/४/२०१२ रोजी कोल्हापुर सेंन्ट्रल स्टँड येथे सकाळी १० वा. किंवा पन्हाळा येथे सायंकाळी ७ वाजेपर्यंत यावे.

शिबीरार्थ्यानी सोबत आणावयाचे साहीत्य:
१) दहा दिवसाठी लागणारे आवश्यक कपडे व ट्रॅकसुट
२) मुलींनसाठी सलवार कमीज,फ़ुल ड्रेस
३) शिबीरार्थ्यानी बेंडीग स्वत: आणावे.(संतरजी व चादर)
४) शिबीरार्थ्यानी स्पोर्ट्स शुज व स्लीपर, हॅवरसॅक,ताट वाटी,चमचा ग्लास,मेणबत्ती,वॉटर बॉटल टॉर्च( दोन जादा सेल)वही,पेन नॅपकीन, व दॆनंदिन गरजेच्या वस्तु.

अधिक माहितीसाठी संपर्क  : 
सूरज ढोली           ९४२ १११ ११८५,    ९७६ ६४० ४०८६
जयदिप जाधव     ९४२ २५१ ९८५३,  ९७६ २४४ ५२५१  
सागर पाटील       ९५७ ९९९ ७१११,    ८२३ ७०७ ९९९९       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *