‘एक पहाट पन्हाळ्यावर’ साजरी करूयात यंदाची दिवाळी गड-किल्ल्यांच्या सहवासात

posted in: Uncategorized | 0
दिनांक: २८ ऑक्टोबर २०१६
ठिकाण : किल्ले पन्हाळगड”पहाट दिवाळीची…….भेट पन्हाळगडाची
दिपोत्सवाच्या उपक्रमाला….साथ तुम्हा सर्वांची”या उपक्रमा आजची तरुण पिढी इतिहासापासून दूर जात आहे अशीच सर्वांची धारणा आहे. पण कोल्हापूर हायकर्सच्या मावळ्यांनी दोन वर्षांपूर्वी एकत्र येउन अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली. पहिल्याच वर्षी या उपक्रमास तरुणाईचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष असून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाचा उपक्रम व्यापक असेल. ज्या छत्रपतींनी आपल्या कर्तुत्वाने या स्वराज्यातील रयतेचे आयुष्य उजळून टाकले त्याच राजांच्या किल्ल्यांना उजळवणयासाठी चला एकत्र येऊया आणि आपल्या आयुष्यातील एक क्षण ह्या गड-किल्ल्यांना देऊया….deep-ustav-179बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात कोल्हापूर हायकर्स नेहमी पुढे असतात. आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. नेमक हेच लक्षात  कोल्हापूर हायकर्स तर्फे या वर्षी पन्हाळा गडावर ९ नोव्हेंबरच्या म्हणजेच धनत्रयोदशीच्या पहाटे दीपोत्सव आयोजित केला आहे.ज्यांना ह्या कार्यक्रमास हजर राहणे शक्य होणार नाही त्यांनी आपल्या परीने सहकार्य करावे. प्रत्येकाने किमान एक “मेणाची  पणती” स्वतः तर्फे द्यावी.
प्रत्येक दिवाळीला आपल्या घरात होणाऱ्या  खरेदीच्या खर्चापेक्षा हि किंमत नक्कीच कमी आहे …….

महाराजांचे मावळे आहोत …..त्याप्रमाणेच राहू
पुन्हा एकदा पन्हाळगडला… दिपोत्सवाच्या प्रकाशात पाहू …..
========================================================================

deep-ustav-187
कार्यक्रमाचे स्वरूप …..
दिनांक: २७ ऑक्टोबर २०१६
* रात्री ११ वाजेपर्यंत आपल्या परिवारातील सर्व शिवप्रेमींनी पन्हाळगडावर बाजीप्रभु पुतळ्याजवळ एकत्रित यावे, जेणेकरून पुढील कार्यक्रमाची आखणी करण्यास सोपे जाईल.सर्व मावळे एकत्र जमल्यावर मावळ्यांनी पुढील दिपोत्सवाच्या तयारीला लागायचे आहे .

*  सर्व शिवप्रेमींनी  किमान एक मेणाची पणतीचे पाकीट घेऊन येण्याचे आहे
(टीप :क्रुपया मातीची पणती आणण्याचे टाळावे जेणे करुन हाताळण्यास सोयीस्कर पडेल)
========================================================================

कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्वांना सूचना …….
– कृपया करून गडावर येताना कोणीही फटाके आणू नयेत
– प्लास्टिकच्या पिशव्या आणू नयेत.
तरी कृपया आपल्या सर्वांना हि आग्रहाची विनंती
=============================================
आपणास ह्या कार्यात सहभागी व्हायचे असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधा :-
सागर पाटील  – ९५७९९९७१११
शशांक तळप  – ९८८१६१८१००
राकेश सराटे   – ८८८८८०१२९९

आपला विश्वासू ,
श्री सागर पाटील
(संस्थापक- कोल्हापूर हायकर्स )
=======================

Click here to Register

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *